‘पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्रात’

“आर्टिफिशियल इन्टेलिजन्स” म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेले पहिले ‘एआय’ विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी या प्रकल्पासाठी कृती दल स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी केली. जागतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शेलार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णयाची माहिती देत राज्य सरकारचा हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असल्याचे सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. तंत्रज्ञान विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योग आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणारे हे विद्यापीठ असेल, असे ते म्हणाले.