3 किलो सोने घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी एकास जामीन मंजुर

रविवार पेठ — पश्चिम बंगाल येथील येथील एका कारागिरांने पुण्यातील एका सोने व्यापाऱ्याला सुमारे दीड कोटी किंमतीचे 3 किलो सोने घेऊन फसवणुक केली होती.त्याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे जमीर शेख यांनी फिर्याद दिली होती.
सदरील फिर्यादीवरून आरोपी मेहबूब शेख ( रा. रविवार पेठ ,मूळ पश्चिम बंगाल ) याला अटक झाली होती. त्याप्रकारणी आरोपी तर्फे ॲड .आदेश चव्हाण यांनी मा. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही .सहारे साहेब यांच्या कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी सरकारी वकील व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद मे. न्यायालयाने ऐकून आरोपीचे वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून ५० हजार रु. च्या जातमुचल्यावर आरोपीस जामीन मंजुर केला.