शहरात ८८ हजार नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस

नगर जिल्ह्यात तेरा मुक्रमायकोसिसचे रुग्ण

अहमदनगर शहरात कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर नगर शहरात  कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता . परंतु , आता लस मुबलक उपलब्ध असली तरी दुसरा डोस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे . शहरात आतापर्यंत ८८ हजार नागरिकांनी दुसरा तर सुमारे २ लाख नागरिकांनी पहिलाच डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे .

 

 

 

 

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा स्तरावर विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत . त्यात प्रामुख्याने लसीकरणासाठी कोरोना विरुद्धचा लढा जिंकलेल्या अनेकजणांना नंतर म्युकर मायक्रोसीस  या आजाराने गाठले आहे . सध्या नगर शहरात म्युकर मायक्रोसीसचा   एकही रुग्ण नाही. परंतु ,जिल्ह्यात १३ रुग्ण म्युकर मायाक्रोसीस साठी उपचार घेत आहेत .
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज ५० ते ६० अंत्यविधी करण्याची वेळ मनपा प्रशासनावर अली होती. परंतु , कोरोनाचा उद्रेक प्रमाणही कमी झाले . महिन्याभरात एकट्या नगर शहरात २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून समजली
   कोविड टेस्टिंग वर  भर  देण्यात आला आहे .

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

 

 

 

सुरुवातीला  मनपाच्या विविध आरोग्य केंद्रावर कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठी गर्दी होती. त्यामुळे मनपाला  अनेकदा नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले आहे. अनेक नागरिकांनी ग्रामीण भागात मिळेल त्या आरोग्य केंद्रावर जाऊन लस घेणे पसंत केले .  नगर शहराची लोकसंख्या सुमारे साडेचार लाख  आहे . त्यापैकी २ लाख ३८ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे , तर दुसरा डोस  १ लाख ५० हजार २४१ नागरिकांनी घेतला आहे .
अजूनही तब्बल ८८ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही . लोकसंख्येच्या  तुलनेत  अजूनही दोन लाख नागरिकापर्यंत लस पोहचली नसल्याचे दिसून येत आहे .

 

 

 

 

     आता कोरोनाची रुग्णवाढ  नियंत्रणात  आली आहे . दररोज सरासरी सात नवे रुग्ण आढळून येत आहेत . तथापि , मिशन शून्य करण्यात मनपाला यश आले आहे नाही . मिशन झिरोकडे जाण्यात सर्वात मोठा अडथळा , प्रतिबंधात्मक नियम न पाळणाऱ्या बेजबाबदार नागरिकांचा आहे .