रांगडा 12 जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित

रांगडा मध्ये अनुभवता येणार कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती, बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, प्रेमकथा, राजकारण, ॲक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून 12 जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शेतकरी पुत्र प्रोडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे, राहुल गव्हाणे, मच्छिंद्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी रांगडा या चित्रपटाचे निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केले असून बाबा सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवाद लेखक म्हणून दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे. अरुण वाळुंज, प्रमोद आंबेडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. भूषण शिवतारे, मयुरी नभाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे, अतिक मुजावर, संदीप रासकर, राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेटकर, निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेल्या छंद त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे रांगडा चित्रपटाचे मुख्य कथासूत्र आहे. याशिवाय तगडे, बलदंड नायक खलनायक देखणी नायिका असल्याने प्रेमकथा, राजकारण, तुफान ॲक्शनचा धडाकेबाज तडका या चित्रपटात आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरच कथानक आजवर अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडते बाहेर आलं असलं. तरी त्यात रांगडा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे. या चित्रपटाच्या सकस कथानकाची मांडणी तांत्रिकदृष्ट्या तितक्याच उत्तम पद्धतीने करण्यात आल्याचे ट्रेलर वरून लक्षात येतं. म्हणून आता केवळ 12 जुलै पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर मोठ्या पडद्यावर रांगडेपणाचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.