बुलेट ट्रेन आता स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करणार

सध्या जपानची मदत घ्यावी लागणार

नवी दिल्ली : भारतात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बुलेट ट्रेन विकसित करण्यासाठीं प्रताय्त्न सुरु झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी जाहीर केले. लोकसभेत त्यांनी सांगितले की, मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प साकारला जाणार आहे. हा प्रकल्प अत्यंत गुंतागुंतीचा असल्याने सध्या यासाठी जपानचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासंदर्भात अधिक बोलतांना ते म्हणाले की,बुलेट ट्रेनसाठी अतिशय उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणि त्यासाठीची अद्ययावत यंत्रणा लागत असल्याने या प्रकल्पासाठी जपानची मदत घ्यावी लागणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ५२० किमी चे अंतर आहे मात्र बुलेट ट्रेनच्या रेल्वे प्रकल्पाची लांबी ५०८ किमी आहे. आणि सध्या यातील ३२० किमीच्या टप्प्यातील कामांना वेग आला आहे.