ऑलिंपिकमध्ये १०० मीटर शर्यंत, विजेता -उपविजेता यांच्यात फक्त ०.००५ सेकंदाचा फरक
अमेरिकेच्या नोह लायलेसने बाजी मारली
परिस : गेल्या दीड दशकात अमेरिका विरुद्ध अमैकर ही स्प्रीटमधील चुरस तीव्रतेने पाहायला मिळाली. त्याची प्रचिती पुन्हा एकदा फ्रान्स स्टेडियमवर पुरुषांच्या शंभर मीटर अंतिम शर्यतीच्या वेळी आली. अवघ्या पाच शतांश सेकंदाने जमैकाच्या किशाने थॉम्पसनवर मात करून अमेरिकेच्या २७ वर्षीय नौह लापलेसने ऑलिंपिकमध्ये वेगवान धावपटू होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न अखेर सत्यात उतरवले. या सुवर्णपदकामुळे त्याने आपल्या चार सुवर्ण पदकाच्या अभियानालाही सुरुवात केली. ऑलिंपिकच्या इतिहासातील ही सर्वात वेगवान शर्यत ठरली नसली तरी आठही धावपटूंमध्ये असलेल्या वेळेच्या फरकाचा विचार करता हो शर्यत वेगवानच होती.