शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक
बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने येथे 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूरमधील अत्याचाराच्या दुर्घटनेमुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असून या बंदमध्ये राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन महाविकास आघाडीकडून सर्वांना करण्यात आले आहे. शाळेतील सफाई कामगारांन दोन निरागस मुलींवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसत मंगळवारी बदलापूरमध्ये उमटले होते. प्रक्षुद्ध जमावाने रेल्वे स्थानकात आंदोलन करत आपला आक्रोश नोंदवला. या मोर्चामध्ये अनेक पक्षांनी सहभाग घेतला होता.