शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने महाराष्ट्रसह इतर राज्यातही झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांना केवळ महाराष्ट्रातच झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. परंतु आता विधानसभा निवडणुकांचे पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्रसह दिल्ली आणि इतर राज्यातही झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. या संदर्भात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. आता नव्या सुरक्षा कवचमुळे शरद पवार यांच्या सुरक्षेतील सीआरपीएफच्या जवानांच्या संख्येत वाढ होणार असून त्यांच्या सुरक्षितेतील जवानांजवळ अत्याधुनिक शस्त्रे राहतील तसेच ते मार्शल आर्टमध्ये कौशल्य प्राप्त असतील. विशेष सुरक्षा पथकानंतर झेड प्लस सुरक्षा सर्वोत्कृष्ट मानले जाते. या जवानांचे संख्या जवळजवळ 55 एवढी असते. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यावर एका युवकाने हल्ला केला होता. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहून सुरक्षा पथकाने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता. हा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला असून या संदर्भातील माहिती सीआरपीच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांना भेटून दिली आहे.