श्री झुलेलाल चालीसा पाठ व सिंधू मंगल कार्यालयाचे नूतनीकरण समारंभ उत्साहात
नगर- श्री गुरुकृपा समाज सेवा ट्रस्ट संचलित भुतकरवाडी रोड, सावेडी येथील सिंधू मंगल कार्यालयाचे नुकतेच नुतनीकरण पूर्ण झाले. नव्या रूपात व साजसज्जेसह तयार झालेल्या वास्तूचे उद्घाटन समारंभ गुरुकृपा ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप आहूजा, सेक्रेटरी सुरेश हिरानंदानी, खजिनदार महेश मध्यान यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अनिल बोरुडे, रमेश तनवाणी, रूपचंद मोटवानी, जयकुमार खूबचंदानी, हरीश खूबचंदानी, ग्यान नवलानी, रमेश कुकरेजा, राणा किरतानी, कपिल किंगर, सुनील बजाज, सागर आहुजा, ठाकूर नवलानी, मनीष आहूजा, जयकुमार रंगलानी, कुणाल मध्यान, प्रेम बजाज, सीए रितेश हिरानंदानी, अमित चिमनानी, तसेच समाजातील अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व श्री गुरुकृपा ट्रस्टचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला वर्ग उपस्थित होते.
प्रारंभी भगवान झुलेलालजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बहिराणो साहिब ची पूजा, आरती व पल्लव चा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सध्या सिंधी बांधवांचा चालीहो उत्सव अर्थात 40 दिवसांच्या उपवासाचा पर्व सुरू असून त्यानिमित्त आहूजा परिवार, मध्यान परिवार, व किंगर परिवार यांनी संयुक्तपणे गायक बल्लू सचदेव व सहकार्यांचा श्री झुलेलाल चालीसा पाठ व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संगीतमय कार्यक्रमाचा उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला. गायक बल्लू सचदेव च्या सुमधुर आवाजाने व भक्तीगीतांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी सुरुची भोजन व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आले होते.