शिवप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन!
अहमदनगर : नगर तालुक्यातील सावेडी सर्कल यांच्यावर लाच लूचपत विभागाने गुन्हा दाखल केलेला असून देखील, त्या ठिकाणीच कामकाज करत आहे ही भूमिका संशयस्पद असून याला जबाबदार कोण? असल्याने सर्कल यांची तात्काळ हकालपट्टी करून दुसऱ्या सर्कलची नेमणूक करण्याच्या मागणीसाठी शिवप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव समवेत संतोष घोलप, महादेव भोसले, शुभम भोंदे, आदिनाथ झीने, एकनाथ झीने आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, सावेडी सर्कल यापूर्वी नालेगाव मध्ये असताना त्यांच्यावर लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. व आज रोजी सावेडी विभागातील सर्कल शैलेजा देवकाते यांच्यावर लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून दुसऱ्या सर्कलची नेमणूक करावी व सर्कल देवकाते यांची अवैद्य व्यवसाय वाले यांच्याशी घनिष्ठ संबंध असून त्यांनी लाखो रुपयाची मोहमाया जमवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी करून आपल्या पदाचा दुरुपयोग करून मिळवलेली आहे. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व आपल्या कार्यालयात कधीही वेळेवर हजर न राहणे, कुठल्याही अधिकाऱ्याला रिस्पेक्ट न देणे सर्व कागदपत्र असून देखील नोंदी अडवणे असे सर्वसामान्य लोकांना कधीही फोन न उचलणे अशा मंगरूर असलेले अधिकारी म्हणून ओळख आहे व देवकाते यांच्यावर लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल करून ही त्या आज सावेडी विभाग सर्कलमध्ये कामकाज करत आहेत तरी प्रशासनाची ही भूमिका संशयास्पद असून याबाबत याला जबाबदार कोण? अशी उलट सुलट चर्चा नगर तालुक्यात चालू असून तरी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन नगर तालुक्यातील सावेडी सर्कलची तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी अन्यथा शिव प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २७ ऑगस्ट २०२४ रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.