स्व. आनंद दिघे यांनी गरिबांचा कैवारी म्हणून राजकारणापलीकडे जाऊन समाजकार्य केले -सचिन जाधव
शिवसेनेच्या वतीने दिवंगत नेते स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य-कर्तृत्व युवा पिढीला प्रेरणादायी आहे. गरिबांचा कैवारी म्हणून राजकारणापलीकडे जाऊन समाजकार्य केले. त्यांच्या विचाराने शहरात शिवसेनेचा झंजावात सुरु असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने मंगलगेट येथील पक्ष कार्यालयात स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जाधव बोलत होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, अनिल लोखंडे, युवकचे शहर प्रमुख महेश लोंढे, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, सचिन सापते, अंगद महानवर, वैद्यकिय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे, रोहित पाथरकर, पोपटराव पाथरे, विशाल शितोळे, परेश खराडे, पांडुरंग घोरपडे, मयूर मैड, धूपधरे, भूषण तोरडमल, अक्षय भिंगारे, सुनील भिंगारदिवे, दामोदर भालसिंग, बबन थोरात, अक्षय लावंड, बंटी भिंगारे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे दिवंगत नेते स्व. आनंद दिघे यांचे राजकीय व सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्वसामान्य वर्ग शिवसेनेला जोडला गेला आहे. सर्व शिवसैनिकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून राजकारण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. पै. महेश लोंढे यांनी बदलापूरसह इतर ठिकाणी महिला आणि मुलींवर अत्याचार घडत असताना आजच्या परिस्थितीत स्व. आनंद दिघे असते, तर त्या नराधमांना कठोर शिक्षा स्वत: दिली असती. त्यांचे कार्य व विचार आजच्या युवकांना अभिमानास्पद व स्फुर्ती देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.