वाडियापार्कमध्ये स्वाभिमानी संघटनेचे भजन – कीर्तन आंदोलन

रात्री 8 ते पहाटे 6 वाजेपर्यंत आंदोलन सुरु

 

अहमदनगर : 

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पांठीबा म्हणून व केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी सुधारणा विधेयकाचा निषेध नोंदवण्यासाठी खासदार  राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या वाडीया पार्कमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळ 3 डिसेंबर ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रात्री 8 ते पहाटे 6 वाजेपर्यंत भजन कीर्तन आंदोलन आयोजित करण्यात आल होत,  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला आहे.  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे यांनी अधिक माहिती दिलीय.  तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याने देखील याबद्दल माहिती दिलीय.