टाइमच्या ‘किड ऑफ द इयर’चा पहिलाच पुरस्कार गीतांजली रावला…
Share
टाइमच्या ‘किड ऑफ द इयर’चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या अमेरिकेतील नागरीक गीतांजली रावला मिळाला आहे. उदयोन्मुख वैज्ञानिक आणि संशोधक म्हणून ओळखल्या जाणार्या पंधरा वर्षीय गीतांजलीची निवड विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ५ हजार मुलांमधून करण्यात आली. टाइमने त्यांच्या Cover Page वर 15 वर्षाच्या गीतांजलीला जागा दिली आहे.
गीतांजली राव ही एक सर्वसाधारण मुलगी नसून तिने आपल्या अवघ्या 15 व्या वर्षात असे काही केले आहे ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. गीतांजलीने असे एक सेंसर बनवले आहे ज्यामध्ये पाण्यातील लेडचे प्रमाण अत्यंत सहजपणे कळू शकणार आहे. त्याचसोबत ही मोठी गोष्ट आहे की, यामध्ये कोणतेही महागड्या डिवाइसचा वापर करण्यात आलेला नाही. हे डिवाइस एका मोबाईल प्रमाणे दिसते. याचे नाव गीतांजली हिने टेथिस असे ठेवले आहे.
पाण्यात काही सेकंदापर्यंत टाकल्यानंतर डिवाइससोबत कनेक्ट अॅप काही वेळात असे सांगते की, पाण्यात किती प्रमाणात लेड आहे. आता गीतांजलीच्या या प्रोटोटाइपवर अमेरिकेचे वैज्ञानिक ही काम करत आहेत.टाइम मॅगझिनसाठी हॉलिवूड सुपरस्टार अँजोलिना जोली हिने गीतांजलीचा इंटरव्यू घेतलाय.