सत्ताधारी विरोधकांना घरी बसविण्याची मनसेला या निवडणुकीत चांगली संधी- निलेश नवले

सत्ताधारी विरोधकांना घरी बसविण्याची मनसेला या निवडणुकीत चांगली संधी- निलेश नवले

नगर- सध्या राज्यामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये फक्त राजकीय कलगीतुरा सुरू आहे रोज विषय काढून एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त आहेत एकमेकांचे कुरघोडीचे राजकारण सर्व सामान्य जनतेला आता नकोसे झाले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौर्‍यामुळे मतदारांचा प्रतिसाद पाहता सत्ताधारी विरोधकांना घरी बसविण्याची मनसेला विधानसभा निवडणुकीत चांगली संधी आहे असे प्रतिपादन काष्टी येथील मनसेचे धडाडीचे कार्यकर्तेव श्रीगोंदा तालुक्याचे संघटक निलेश नवले यांनी केले आहे.

मनसेचे अध्यक्ष अमित ठाकरे नगर दौर्‍यावर आले असता कार्यकर्त्यांसह त्यांनी उपस्थित राहून श्रीगोंदा मतदार संघाची सध्याची राजकीय परिस्थितीची माहिती दिली मनसेची संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यावर चांगली पकड निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनता राज ठाकरे यांच्या विचारांशी सहमत असल्याने विधानसभेत आपल्या पक्षाला यश मिळेल. असा भावना व्यक्त करून कार्यकर्त्यांना यावेळी अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

निलेश नवले यांच्या कार्याची माहिती श्री ठाकरे यांनी घेतली. व कार्यकर्त्यांना नवले यांच्या मागे ताकत उभी करून त्यांना विधानसभेत पाठवा असे सांगितले. या वेळी राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत जल्लोष केला. श्रीगोंदा मतदारसंघात मनसेचा आमदार विजयी करणारच असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने निलेश नवले यांनी राजकीय मोर्चेबांधणी केली. गावागावात मनसेच्या शाखा, संघटना यांची बांधणी पूर्ण केली. असल्याने जनतेच्या मनात भावी आमदार म्हणून निलेश नवले बसले आहे. त्यांच्या विजयासाठी जनताच विधानसभा निवडणूक हाती घेईल असे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.