भारताने घरच्या मैदानावर सलग १८वी कसोटी मालिका जिंकली. मंगळवारी भारताने बांगलादेशचा कानपूर कसोटीत ७ गडी राखून पराभव केला. भारताने २०१३ पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नाही. ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावरील १० मालिका विजयांचा विक्रम भारताने यापूर्वीच मोडला आहे.
◆ भारताचा हा १८०वा कसोटी विजयही आहे. भारताने द.आफ्रिकेला (१७९ विजय) मागे टाकले. भारताने प्रति षटक ७.३६ च्या वेगाने धावा केल्या. कसोटी इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने दोन्ही डाव मिळून प्रति षटक ७ धावा करत फलंदाजी केली आहे.
◆ कानपूर येथील कसोटी सामन्यात दोन्ही संघांचा सरासरी रन रेट प्रति षटक ४.३९ धावा राहिला. ही भारतामध्ये आतापर्यंत खेळण्यात आलेली सर्वात वेगवान कसोटी ठरली आहे. यशस्वीने दुसऱ्या डावातही अर्धशतक केले. त्याच्या २०२४ मध्ये ९२९ धावा झाल्या. – या २३ वर्षे वयापूर्वी कोणत्याही भारतीयाच्या एका वर्षांत सर्वाधिक कसोटी धावा. सुनील गावस्कर (९१८ धावा) यांना मागे टाकले.