होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी… अशी ओळख शूरवीर जिवाजी महालेंची आजरामर झाली – आ.संग्राम जगताप
सकल नाभिक समाजाच्या वतीने जिवाजी महाले जयंती साजरी
नगर – छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक म्हणून जिवाजी महाले यांचा प्रतापगडावरील पराक्रम सर्वांना माहिती आहे. अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर गुपचूप वार करणार्या सय्यद बंडाचा हात वरचेवर कलम करुन महाराजांचे प्राण वाचविले. स्वराज्यावरील संकट स्वत:वर घेणारे शूरवीर जिवाजी महाले इतिहासात अमर झाले. त्यामुळेच होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशी म्हण तयार झाली व तीच ओळख शूरवीर जिवाजी महालेंची आजरामर झाली असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. नगर येथे शूरवीर जिवाजी महाले जयंती निमित्त पंचाचा वाडा येथे सकल नाभिक समाजाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, माणिक विधाते, जिल्हाध्यक्ष बाळसाहेब भुजबळ, माऊली गायकवाड, मनोज नन्नवरे, बबन काशीद, संदीप शिंदे, संतोष शिंदे, ललित मदने, सागर शेळके, प्रमोद वाघमारे, विवेक मदने, बापू औटी, बाबुराव दळवी, संतोष जाधव, रमेश बिडवे, आशिष ताकपिरे, पंचकमिटीचे बाबुराव ताकपिरे, लालू काशिद, दिपक जाधव, प्रभाकर सांळुखे, अनिल निकम, विशाल सैंदाणे, निलेश पवळे, श्रीपाद वाघमारे, विशाल गायकवाड, पंकज राऊत, मनिष इंगळे, मच्छिंद्र बनकर, भाऊसाहेब कोल्हे, भानुदास बनकर, सुरेश चुटके, रोहित शिंदे, प्रशांत शिंदे, दिपक काशिद, अजिंक्य भुजबळ, देवेंद्र बंड, शुभम राऊत, संतोष भालेराव, दिपक बिडवे, सुशिल थोरात, संतोष साळुंके, ज्ञानेश्वर कविटकर, पांडुरंग शिंदे, योगेश पिंपळे तसेच नाभिक समाजाचे पदाधिकारी, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.