शिडीं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन
परदेशी भाविकांना कमीत कमी वेळेत शिर्डीला पोहचणे शक्य
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साईबाबा इंटरनॅशनल एआपोर्टवर सुमारे ६१५० कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल उभारले जात आहे. त्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाला. टर्मिनल उभारणीचे काम २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगण्यात येते. देश-विदेशात साईभक्त असून, शिडीत दर्शनासाठी येण्यासाठी हे विमानतळ महत्वाचे आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या टर्मिनलमध्ये प्रवाशांसाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात प्रवाशासाठी सात लिफ्ट व तितकेच सरकते जीने आहेत. शिवाय एकाच वेळी १२०० प्रवाशांची विमानात ऑपरेशन क्षमता होणार असल्याचे सांगण्यात आले.