जिल्ह्यातील २८ परीक्षा उपकेंद्रांवर पूर्व परीक्षा

अहिल्यानगर : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा-२०२४ चे आयोजन १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत जिल्ह्यातील २८ करण्यात आले आहे. उपकेंद्रांवर परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक, झेरॉक्स मशीन, स्कॅनिंग मशीन, मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वस्तू कार्यान्वित ठेवू नयेत. परीक्षा उपकेंद्राच्या परिघात परिक्षार्थी म्हणून घोषित केलेले उमेदवार व परीक्षा पार पाडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना वाहने अथवा पायी फिरण्यास, उभे राहण्यास प्रतिबंध केल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. परीक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने संपूर्ण नियोजन केले आहे.