रस्त्यावरील वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारून गेल्याने पेविंग ब्लॉक खचून मोठा अनर्थ टळला.

महापालिका आयुक्त यांचे दुर्लक्ष.

पूर्णकृती पुतळा तयार झाला असून पुतळ्याचे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)-अनेक वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची मागणी करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्याशेजारी  नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले. व सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण झाले असून देखील मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पुतळा बसवण्यात आला नसून जुना पुतळा आहे त्या ठिकाणीच ठेवण्यात आलेला आहे मात्र त्याला संरक्षण भिंत नसल्याने कोणतीही घटना घडू शकते व शेजारी लावण्यात आलेले पिविंग ब्लॉक वर दुपारच्या सुमारास वाहन गेली व पेविंग ब्लॉक खचून सुदैवाने पुतळ्यावर वाहन गेली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून. अशी कोणतीही घटना घडू नये त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बॅरीकेट लावण्यात यावे अशी मागणी रिपाई आंबेडकर पक्षाचे रोहित आव्हाड, बौद्धचार्य संजय कांबळे, भीमसैनिक जिवा कांबळे, आरपीआय आठवले गटाचे अविनाश भोसले यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेऊन मागणी केली आहे. अन्यथा समस्त आंबेडकर समाज बांधव व भीमसैनिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.