प्रा.वसुधा देशपांडे यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदान

नगर – आहिल्यानगर येथील रहिवासी प्रा. सौ. वसुधा ज्ञानेश देशपांडे यांना त्यांच्या ‘पहिलीच कामिनी: एक गूढ रहस्य’ या रहस्यमय कादंबरीसाठी नवोदित लेखिका म्हणून नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) यांच्या तर्फे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. यावेळी दिनकरजी शिलेदार, छंद दिवाळी अंकाचे संपादक डॉ. भारती चव्हाण, गुणवंत कामगार मंडळाच्या अध्यक्षा अजितजी चव्हाण भाजप प्रवक्ते आणि सावजी सर भाजप नेते यांची विशेष उपस्थिती होती.

     पुरस्काराचे वितरण पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवार 5 जानेवारी 2025 ला नाशिक येथे संपन्न झाला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आयएमएस चे सरसंचालक डॉ. शरद कोलते सर, आयएमएस च्या ग्रंथपाल डॉ स्वाती बार्नबस मॅडम सर्व आप्त स्नेही व मित्र परिवार यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

     आपल्या पहिल्याच कादंबरीची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरच्या या विशेष पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल प्रा.सौ. देशपांडे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र जी देशपांडे आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

     हा पुरस्कार ही खर तर एक जबाबदारी असून भविष्यात अजून चांगले काम आपल्या हातून घडावे या शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले.