भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय अंतर्गत क्रीडा मेळावा
खेळामुळे कृतीशीलता येऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढीस लागते -प्राचार्य भरत बिडवे
नगर- विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे आहे. स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडूंमध्ये खिलाडीवृत्ती असली पाहिजे खेळामुळे कृतीशीलता येऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढीस लागते असे अनेक फायदे मैदानी खेळामुळे होत असतात परंतु नवीन पिढी मोबाईल मध्ये गुंतली जात आहे या ऐवजी विद्यार्थ्यांनी मैदानावर विविध प्रकारचे खेळ खेळले पाहिजे भाग्योदय विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन ना.ज. पाऊलबुद्धे विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे यांनी केले.
केडगाव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य भरत बिडवे व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे यांच्या हस्ते हवेत फुगे व कबूतर सोडून झाले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, कदम गोविंद, कोतकर बाबासाहेब, आदी उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या गुणांची पारख होण्यासाठी शालेय उपक्रम राबवण्यात येत असतात यामधील क्रीडा मेळाव्याचे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व बौद्धिक तसेच भावनीक विकास होण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्यातील गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. विद्यालयाच्या प्रोत्साहनाने अनेक विद्यार्थी शालेय राज्य व जिल्हास्तरावर चमकत आहेत याचा विद्यालयाला अभिमान आहे.
महेंद्र हिंगे यांनी आपल्या मनोगतात क्रीडा स्पर्धा ह्या आनंदाचा क्षण आहे खेळाडूंना स्पर्धा परीक्षेमध्ये 5 टक्के आरक्षण आहे व 10 वी व 12 वी परीक्षेत 10 गुण आहेत नोकरीत संधी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून खेळामध्ये भाग घ्यावा. खेळामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होतो. सांघिक भावना वाढीस लागतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक एकनाथ होले यांनी मांडली तर सूत्रसंचालन दत्तात्रय पांडुळे यांनी केले. आणि आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक सोपान तोडमल यांनी मांडले. या क्रीडा स्पर्धेत खो-खो, गोळा फेक,कबड्डी भालाफेक, धावणे, संगीत खुर्ची तसेच मनोरंजनात्मक खेळांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोतकर बाबासाहेब, साहेबराव कार्ले, धनंजय बारगळ, संतोष काकडे, आदिनाथ ठुबे, गोरक्ष कांडेकर, क्रीडा शिक्षक सोपान तोडमल, एकनाथ होले तसेच गणेश गायकवाड, कावरे बाळासाहेब, सुधाकर गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.