माहेरचा सन्मान अधिक भावणारा -राज्यमंत्री सौ माधुरी मिसाळ नूतन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा नगरमध्ये सन्मान
नगर – सर्वांच्या सहकार्यातून लोकप्रतिनिधी म्हणून झालेली निवड ही निश्चितपणे सगळ्यांचे सामूहिक यश आहे. अनेक मानसन्मान सतत होत असताना त्यामध्ये अहिल्यानगर मध्ये झालेला सन्मान हा माहेरचा सन्मान असून तो अधिकच भावणारा असल्याचे प्रतिपादन नूतन राज्यमंत्री सौ माधुरी मिसाळ यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
अहिल्यानगर मध्ये त्यांच्या आगमन प्रसंगी लाड सुवर्णकार समाज ट्रस्टच्या वतीने सौ माधुरी मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या .
या प्रसंगी लाड सुवर्णकार समाज ट्रस्ट यांच्या वतीने अनिकेत कुलथे यांनी माननीय आमदार माधुरी ताई मिसळ यांचा अहील्यानगर इथे आल्या असता विश्राम गृह इथे शाल देऊन सन्मान केला. त्या प्रसंगी ट्रस्ट चे संचालक सचिन देवळालिकर, सुरेश मैड, मुकूंद निफाडकर, शाम मुंडलक, विनोद कूलथे, योगेश नांगरे , रमेश मुंडलीक, प्रकाश देवळालिकर, शरद कुलथे, गणेश डहाळे इत्यादी सर्व कार्यकर्ते हजर होते.