महापुरुषांचे पुतळे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी- अशोक गायकवाड.

आंबेडकरी समाजाचे १७ जानेवारी पासून महानगरपालिके समोर आमरण उपोषण.

नगर (प्रतिनिधी)- बहुजन आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, महाराष्ट्रातील परभणी व मस्साजोग येथील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध करून मारेकऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली असून अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे. त्यास मुक्त करून २६ जानेवारी पर्यंत पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण नगर शहरात करून आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार करावे तसेच नगर शहरातील मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धकृती पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर करावे व पुतळ्याचे पावित्र्य राखावे तसेच नगर शहरातील टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पूर्ण बांधणी नव्याने करून सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, व्यायाम शाळा, जिम याची निर्मिती करावी तसेच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत अल्पसंख्यांक विभाग भारत सरकार यांच्या योजनेतून महापालिकेने त्यांचे मौजे पिंपळगाव माळवी येथील तलावानजीक १० एकर जागेत मेडिटेशन हॉल बांधावे तसेच नगर शहरातील सामाजिक न्याय भवन सावेडी येथील जागेची संरक्षण भिंत बांधून प्रवेशद्वारासाठी उपलब्ध निधीचा वापर करून जनतेची देखणी वास्तु सुरक्षित करावी या मागणीसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी बहुजन आंबेडकरवादी चळवळीचे प्रणेते अशोक गायकवाड समवेत चर्मकार संघर्ष समितीचे शिवाजीराव साळवे, विजय भांबळ, बौद्धचार्य दीपक अमृत, अमित काळे, प्रा.भीमराव पगारे, विनोद भिंगारदिवे, नितीन कसबेकर, कैलास पगारे, दया गजभिये, यशवंत भांबळ, ऍड आनंद सूर्यवंशी, शैनेश्वर पवार, प्रवीण चाबुकस्वार, उत्तमराव साठे, चंद्रकांत भिंगारदिवे, आदित्य भांबळ, सदाशिव भिंगारदिवे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.