अहिल्यानगर शहरातून ३ हजार ७१४ ओव्हरलोड गाड्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेली वसुली बंद करण्याची मागणी- अजय मखरे.

बहुउद्देशीय वाहतूक चालक-मालक माथाडी मंडळाचा आरोप.

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात अनेक ओव्हरलोड वाहने येतात व जातात या वाहनांना आरटीओ चे अधिकारी इन्स्पेक्टर श्याम चौधरी, ए आरटीओ मिथुन पाटील, दिनेश पाटील, कल्पेश सूर्यवंशी हे गेली कित्येक वर्ष ओव्हरलोड वाहने नगर हद्दीतून जाऊन देतात कारण एका वाहनामागे ३ हजार रुपये एजंट मार्फत उकळले जाते. एकूण शहरातून ३ हजार ७१४ वाहने अहिल्यानगर हद्दीतून संपूर्ण महाराष्ट्रात जाणे येणे करतात हे बेकायदेशीर वाहनांचे एजंट मार्फत एकूण रक्कम १ कोटी ११ लाख ४२ हजार रुपये दरमहा गोळा करतात हे सर्व पैसे आरटीओ चे अधिकारी सगरे यांच्या अधिपत्याखाली गोळा केलेली जाते व सर्व एकत्रित पाकिटे दिली जातात हे कित्येक वर्षापासून चालू आहे याबद्दल संघटनेने वाहतूक असंख्य वेळा आयुक्त परिवहन मंत्री यांना निवेदन दिले परंतु यात दर तीन महिन्यानंतर पैसे वाढ दिसते व हे अधिकारी पूर्ण भ्रष्टाचारी आहे. गरीब ट्रक ड्रायव्हर याने हप्ता देण्यास टाळले तर त्यास शिकारी प्रमाणे पकडून भरपूर रकमेचा दंड वसुली करतात व वाहने जप्त करतात. व ट्रक ड्रायव्हर चालकास अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यात येते. अधिकारी हे काम न करता गायब असतात अधिकाऱ्यांचे कित्येक वर्षापासून त्यांची बदलीच झालेली नाही. व कित्येक वर्षापासून वाहने नियमित नगर हद्दीतून जातात ओव्हरलोड कायम राहून वजन काटा पावती, टोलनाकेच्या सीसीटीव्ही मध्ये कॅमेरात कैद आहे. ते सर्व पुरावे यातील फक्त नमुना व प्रायोगिक तत्त्वावर मागील दोन वर्षात एक तरी ओव्हरलोड मेमो दंड केलेला अशी वाहनांची १०० वाहने क्रमांक यादी दिलेली आहे त्या आज सुद्धा ओव्हरलोड वाहतूक करतात मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई झालेली नाही व होतही नाही कारण त्यांचे एजंट मार्फत दरमहा हप्ते चालू आहे त्यांच्यावर कारवाई करावी सर्वांना सारखे नियम का नाही फक्त जो दरमहा हप्ता देणार त्याला सूट आणि हप्ता न देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई आयुक्त यांना कळवले तरी चौकशीत काही नाही झाले ते कळवत नाही उलट नागरिकांना व जनतेला हा भ्रष्टाचार दिसतो त्यामुळे शहरातून ओवरलोड गाड्या हे बंद करण्यात यावे तसेच ओवरलोड गाड्या सोडण्यासाठी पैसे घेणे व गाड्या पासिग करण्यासाठी पैसे घेणे व रात्रीच्या वेळी चेक पोस्ट ठिकाणी पैसे घेणे हे बंद करून चालकाला यापासून मुक्ती मिळावी यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बहुउद्देशीय वाहतूक चालक-मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष एल.जी.पांडुळे व अजय मखरे यांनी माहिती दिली.