जिजाऊ ब्रिगेडचा २७ वा स्थापना दिन साजरा.

संक्रांतीनिमित्त विचाराचे वाण सर्व जाती समभाव एकत्र घेऊन चालण्याच्या कार्यास सुरुवात करणार जिल्हाध्यक्ष ॲड.स्वाती जाधव.

नगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यासारख्या दोन सुपुत्रांवर उत्कृष्ट संस्कार करत कठीण परिस्थितीत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. एक महिला देशासाठी काय करू शकते? जिजाऊंचे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणून जिजाऊंच्या नावाने सुरू करण्यात आलेली जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून महिलांना अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी परंपरा यातून बाहेर काढत संस्कारी समाज निर्माण करण्याचे काम जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सुरू आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या २७ व्या स्थापना दिना निमित आज नगर शहरातील ऐतिहासिक वास्तू संग्रालयाच्या आवारातील शहाजी राजे व जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यासमोर यांनी गारद करत जिजाऊ वंदना गाऊन पुतळ्यास पुष्पहार घालून जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्थापना दिन साजरा केला या वेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष  इंजि.सुरेश इथापे, इंजि. निंबाळकर, सेवा संघाचे अमोल लहारे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, प्रदेश सहसंघटक कल्पना ठुबे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष ॲड.स्वाती जाधव, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा रेशमा आठरे, सामजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे, जिजाऊ ब्रिगेडच्या अहिल्यानगर कार्याध्यक्ष योगिता कर्डिले,  सुनंदा तांबे, माजी विभाग सचिव पद्माताई गांगर्डे, भावना केदार, व्याख्याता व लेखिका सोनाली वाघमारे, स्मिता वाल्हेकर, सर्प मैत्रीण भारती शेवते, रुबीना खान, शालिनी राठोड आदी उपस्थित होते.
महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत.काही महिला ते आव्हाने स्वीकारून पुढे जातात तर काहींना साथ देण्यासाठी आधार नसल्याने त्यांना थांबावे लागते अशा महिलांसाठी गाव तेथे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा उघडून महिलांना साथ द्यावी आणि नूतन जिल्हाध्यक्ष ॲड.स्वाती जाधव या ते काम करतील असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे इंजी.सुरेश इथापे यांनी केले.
जिजाऊ माँसाहेबांच्या जन्म जयंतीच्या सोहळा निमित्त सिंदखेडराजा येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यात जिजाऊ ब्रिगेडच्या दोन महिला जिल्हाध्यक्षांना संधी देण्यात आली असून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या दोन्हीही नूतन जिल्हाध्यक्ष चांगले काम करतील असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष राजश्री शितोळे यांनी केले.
जिजाऊ माँसाहेबांनी जे काम केले स्वराज्याचे स्वप्न पाहून अठरापगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्मिती केली त्यांचेच प्रेरणा घेऊन येथून बाराबलुतेदारांना बरोबर घेऊन महिलांचे संघटन करायचे आहे. त्यांच्या समस्या तसेच त्या समस्यांचे निराकरण आणि पुढे जाण्याची प्रेरणा देण्यासाठी इथून पुढे जिजाऊ ब्रिगेड कार्य करील असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या नूतन जिल्हाध्यक्ष ॲड. स्वाती जाधव यांनी केल आहे. जिजाऊ ब्रिगेडचे कार्य करण्यासाठी कोणताही जाती धर्म न पाहता ज्या ज्या महिलांना जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून कार्य करायचे आहे त्यांनी जिजाऊ ब्रिगेडशी संपर्क साधावा असे आवाहनही ॲड. स्वाती जाधव यांनी केले आहे.
तर नूतन कार्याध्यक्ष योगिता कर्डिले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना जिजाऊ ब्रिगेडचे आजपर्यंतचे जे कार्य आहे ते कार्य असेच पुढे नेत यामध्ये अजूनही काही वेळेनुसार बदल करून सर्व सामान्य गृहिणी बरोबरच सर्व क्षेत्रातील विविध ठिकाणी उच्चपदी असलेल्या महिलांना सोबत घेऊन जिजाऊ ब्रिगेडचे कार्य अजून जोमाने करणार असल्याचे सांगितलय.
जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी सिंदखेड राजा येथे  नगर जिल्ह्यातील ॲड. स्वाती जाधव आणि नंदिनी सोनाळे यांची जिल्हाध्यक्षपदी तर  नगर शहर कार्याध्यक्ष योगिता कर्डिले यांची निवड करण्यात आली असून लवकरच जिजाऊ ब्रिगेडची नूतन जिल्हा कार्यकरणीची उभारणी करण्यात येणार आहे.ज्या महिलांना जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून कार्य करायचे आहे. त्या महिलांनी कार्यकारणीत येऊन कार्य करावे जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकारणी मध्ये काम करण्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचे बंधन नसून ज्या महिलांना सामाजिक कार्याची आवड आहे त्या महिलांनी ॲड. स्वाती जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.