जश्ने मौलुदे काबा (हजरत अली) यांच्या जयंती निमित्त तख्ती दरवाजा येथे महाप्रसादाचे वाटप
नगर (प्रतिनिधी)- १३ रज्जब हजरत अली यांच्या जयंती निमित्त जश्ने मौलु दे काबा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहमदनगर शहरात ही परंपरा २७ वर्षा पूर्वी शेख हाफिज मोहमंद उमर यांनी तख्ती दरवाजा येथे चालू केली मागील ४ वर्षांपासून ही परंपरा त्यांचे चिरंजीव शेख मोहम्मद हुसैन हे चालवत आहे. अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी आज हा दिवस उत्सवात साजरा करण्यात येतो,
जगातील हजरत अली एकमेव व्यक्ती आहे ज्यांचं जन्म हा खाना ए काबा येथे झालेला आहे. यापुढे कोणाचाही जन्म त्याठिकाणी होणार नाही हजरत अली हे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जावई होते. हजरत अली यांना शेरे खुदा म्हणून संभोधलं जातं सालाबादप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्सवात तख्ती दरवाजा येथे महाप्रसाद वाटप करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी इब्राहीम शेख, हाफिज उमर शेख, कासीम शेख, मोहमंद हुसैन शेख, साजिद सय्यद, जावेद शेख, फुरकान शेख, साबीर शेख, मोसीन शेख, तनवीर शेख आदीसह तख्ती दरवाजा यंग पार्टीचे व मौला हुसैन फाउंडेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते.