जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा संघ हिंगोलीला रवाना

पहिला सामना यवतमाळ बरोबर रंगणार

नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ बसमतनगर (जि. हिंगोली) येथे होणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. संघाचा पहिला सामना यवतमाळ जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे.
या संघाची निवड नुकतेच झालेल्या लीग अजिंक्यपद स्पर्धेतून करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे मानद सचिव रोनप फर्नांडिस यांनी या खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्याच्या संघात शशांक वाल्मिकी (कर्णधार), अक्षय बोऱ्हाडे, अभिषेक भांबळ, योगेश चेमटे, रितेश रानमळे, ऋतीक छजलानी, मयूर गोरखा, प्रदीप सिंग, रौनक जाधव, ऋषी कनोजिया, सार्थक भोसले, हिमांशू थोरात, सुयोग महागडे, ओम दंडवते, तनिष गायकवाड, अरमान फकीर, यश कोठले, ऋषभ मणी, जॉय शेलके, अरमान शेख, साहिल उरमुडे, नवाज रऊफ शहा यांचा समावेश आहे.
संघ व्यवस्थापक राजू पाटोळे व प्रशिक्षक सुभाष कनोजिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा संघ सदर स्पर्धेत सहभागी झाला आहे. या संघाची निवड विक्टर जोसेफ, राजू पाटोळे, खालिद सय्यद व सुभाष कनोजिया यांच्या निवड समितीने केली आहे.
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष जोगा सिंग मिन्हास, खालिद सय्यद, खजिनदार रिशपालसिंग परमार यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.