योग विद्या धाम संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी परिक्षा भय निर्मुलन वर्ग

ताण तणाव न घेता विद्यार्थ्यांनी उत्तिर्ण व्हावे

अहिल्यानगरः – दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना  ताण तणाव न घेता बोर्डाची परिक्षा व्यवस्थित देऊन चांगल्या मार्कांवर उत्तिर्ण व्हावे म्हणून येथील योग विद्या धाम चे वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत वर्ग दि.21 जानेवारी पासून घेतले जाणार आहेत. अशी माहिती योग विद्या धाम चे अध्यक्ष डाॅ सुंदर गोरे यांनी दिली.
             दिवसेंदिवस वाढत जाणा-या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करूनही त्यांच्या शरीरावर व मनावर ताण येतो. त्यामुळे डोकेदुखी,निद्रा नाश, परीक्षेच्या आधी ताप येणे या सारखे आजार होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी परिक्षा भय निर्मुलन वर्ग आयोजित केले  असून यामध्ये यौगीक प्रक्रिया शिकवून त्या द्वारे परीक्षेची भीती कशी कमी होईल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.  हे वर्ग दि. २१  जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत झूमवर ऑनलाईन घेतले जाणार आहेत.
        हे वर्ग संपूर्ण मोफत घेतले जाणार आहेत.  तरी या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन योग विद्या धाम चे वतीने करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी योग शिक्षका सौ. दिपमाला लांडे भ्रमणध्वनी नं ७९७२३५३२२५ यांचेशी संपंर्क साधावा. या वर्गासाठी  झुमरू मिटींग आयडी -851 1038 2722 व पासवर्ड 123 आहे. प्रत्येकाला आपल्या घरातून हा वर्ग करता येणार आहे.