मुंबई :
प्रेक्षकांना आपल्या नृत्यातील दिलखेच अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने आपला मराठी बाणा जपत आपल्या नृत्य करिअरमध्ये महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
सोनाली कुलकर्णी झी मराठीवरील ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज’चा ग्रँड फिनाले लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सेटवर सोनालीने एक महत्वाचा निर्णय घेतला.
सोनाली कुलकर्णी शक्यतो मराठी कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य करणार नाही. हे सोनालीला खूप मनापासून वाटत आहे. आणि ती ही गोष्ट फॉलो करत आहे. सोनालीने नुकत्याच पार पाडलेल्या डान्सिंग क्वीन कार्यक्रमात आपल्या मराठी गाण्यांवर नव्या पद्धतीने परफॉर्म केलं आहे.