कर्जतमध्ये 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त 

कर्जत : 

माहीजळगाव मध्ये  कर्जत पोलिसांनी 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 23 डिसेंबर 2020 ला रात्री दहा वाजता  कर्जत पोलिसांनी माहीजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर मध्ये छापा टाकलाय.  या टपरीमधून महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला 88 हजार 51 रुपये किमतीचा गुटखा त्यांनी जप्त केला असून गुटखा विक्रेता लक्ष्मण भिसे  याला  रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

हि कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, गोवर्धन कदम, अमित बरडे, सुनील खैरे यांनी ही कारवाई केली असून या गुन्ह्यात पोलीस अंमलदार सुनील खैरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हाचा तपास पोलीस अंमलदार प्रल्हाद लोखंडे हे करत आहेत.