कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराई जवळ रात्री उशिरा खाजगी ट्रॅव्हल बस व सेंट्रो कारचा अपघात होऊन त्यात तीन जण जागीच ठार झाले असून एक जणांचा रुग्णालयात दाखल केल्यावर मृत्यु झाला आहे.
बाळासाहेब शंकरराव कदम, वय 60 रा जायगाव ता.परळी जि. बीड, परमेश्वर लक्ष्मण डाके वय 40 रा.धामणगाव ता.पाथ्री जि परभणी आणि केशव विलास बोराटे वय 23 रा मंठा जि जालना अशी मृतांचे नावे आहेत.
सुभद्रा हॉटेल समोर त्रिभुनवाडी शिवारात खाजगी बस क्र एम एच 38 x 8555 ही पुण्याहून नांदेडकडे जात असतांना संट्रो कार क्र एम एच 12 सीडी 2917 ही पुण्याच्या दिशेने चाली असतांना या गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे.