‘ग्रो मोअर’ घोटाळ्यात धक्कादायक खुलासा!
1.5 कोटींची ऑनलाईन खंडणी घेतली आणि चार पोलीस झाले निलंबित!

1.5 कोटींची ऑनलाईन खंडणी घेतली आणि चार पोलीस झाले निलंबित!
शिर्डीच्या ‘ग्रो मोअर’ कंपनीच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी 4 पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ₹1.5 कोटी ऑनलाईन घेतल्याचा सनसनीखेज प्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलून
PSI तुषार धाकराव
मनोहर गोसावी
बापूसाहेब फोलाणे
गणेश भिगारदे
या चौघांना तात्काळ निलंबित केलं!
आरोपी भूपेंद्र सावळे याने चौकशीत सांगितलं की,
15 जानेवारी रोजी त्याला पोलिसांनी लोणीजवळ अडवलं.
“आरबीआय परवाना नसताना पैसे उभे केलेस, आता गुन्हा लागणार!”
अशी धमकी देत दीड कोटींची मागणी केली.
त्याला थेट अहमदनगर SP ऑफिसच्या पार्किंगमध्ये नेऊन ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दबाव टाकण्यात आला आणि अखेर ₹1.5 कोटी ट्रान्सफर करावे लागले!
प्राथमिक चौकशीत सत्यता आढळून आल्यानंतर चौघांना निलंबित करण्यात आलं.
डॉ. शरद गोर्डे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.
‘ग्रो मोअर’ घोटाळा अंदाजे ₹500 कोटींचा असून 3,000+ गुंतवणूकदार फसले आहेत!
हे प्रकरण विधानसभेत गाजले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य –
“कोणीही दोषी असतील, त्यांनी कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्यांच्यावर कारवाई होणारच!”
“सिस्टमवरचा विश्वास डळमळीत करणारी ही घटना – आता जनतेला न्याय मिळतो का, याकडे राज्याचं लक्ष!”