ठाकरे सेनेचे किरण काळे बलात्कार प्रकरणात अटकेत! खोटा गुन्हा असल्याचा दावा, राजकीय खळबळ उडाली!
अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर 21 वर्षीय विवाहितेने वारंवार बलात्काराचा आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे

अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर 21 वर्षीय विवाहितेने वारंवार बलात्काराचा आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी मंगळवारी पहाटे दीड वाजता काळे यांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
किरण काळेंवर नेमका आरोप काय?
पीडित विवाहितेचा दावा आहे की, घरगुती त्रासातून सुटका मिळावी म्हणून काळे यांच्याकडे मदतीसाठी गेली असता, त्यांनी कार्यालयात बोलावून जवळीक साधली आणि वेळोवेळी अत्याचार केला. आर्थिक मदतीचं आमिषही दाखवलं गेलं.
पण दुसरी बाजू काय सांगतेय?
ठाकरे सेनेचा दावा — “हा गुन्हा पूर्णपणे खोटा आणि पूर्वनियोजित आहे!”
किरण काळे यांनी नुकतेच महानगरपालिकेतील ₹400 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता.
याबाबत त्यांनी सरकारकडे ठोस पुरावे सादर केले आणि सरकारी निधी अपहाराचा मुद्दा उचलला होता.
त्यामुळेच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी, खोट्या प्रकरणात अटक केल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे.
खासदार निलेश लंके यांचा निषेध:
“किरण काळे हे एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले. त्यामुळे त्यांच्यावर हा खोटा गुन्हा लावला गेला आहे,”
असे लंके यांनी स्पष्ट केले. ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.
पक्षाचा इशारा:
“हा खोटा गुन्हा मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन होईल!”
– विक्रम राठोड, राज्य सहसचिव, ठाकरे सेना
हा प्रकार राजकारणात दबाव तंत्र वापरण्याचे स्पष्ट संकेत देतो. सत्य काय, हे न्यायालयीन तपासात स्पष्ट होईल, पण सोशल मीडियावर मात्र हा विषय सध्या तुफान चर्चेत आहे.