मराठवाड्याला दिलासा! यंदा पाण्याची चिंता नाही – पण वापर सुज्ञपणे करा: राधाकृष्ण विखे पाटील
"यंदा मराठवाडा वणवण भटकणार नाही, पाणी भरपूर आहे... पण ते जपून वापरलं पाहिजे!" – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्पष्ट संदेश.


पैठण – जायकवाडी धरण जलपूजन सोहळा
“यंदा मराठवाडा वणवण भटकणार नाही, पाणी भरपूर आहे… पण ते जपून वापरलं पाहिजे!” – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्पष्ट संदेश.
पैठणच्या जायकवाडी धरणात ९१.७८% पाणीसाठा
मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन आणि १८ दरवाजे उघडून ९,४३२ क्युसेक विसर्ग सुरू
गोदावरी नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वरून अजूनही येतंय १३,९७० क्युसेक पाणी
“गोदावरीच्या कृपेमुळे सुजलाम-सुफलाम मराठवाडा; हे शक्य केलं शंकरराव चव्हाणांनी!” – विखे पाटील यांचा गौरवोद्गार
वेदपाठ, मंत्रोच्चार, जलपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती
जायकवाडी धरण भरल्यामुळे आता मराठवाड्याला दिलासा मिळालाय, पण पाणी फुकट घालवू नका – असं स्पष्ट आवाहन सरकारकडून!