असाही साजरा केला जातो नगरमध्ये व्हॅलेन्टाईन्स डे
शहीद भगतसिंग व पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून जागरूक नागरिक मंचाने साजरा केला व्हॅलेन्टाईन्स डे
हिंदू मुस्लिम शीख इसाईना एकत्र करून दिला एकता व मानवतेचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी): आपसातील प्रेमाचे प्रतीक असललेला व्हॅलेन्टाईन्स डे नगरमध्ये आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो . अहमदनगर मधील जागरूक नागरिक मंच दरवर्षी हा व्हॅलेन्टाईन्स डेअशाच प्रकारे साजरा करते . मैत्रीच्या नात्यात प्रेम व्यक्त करण्याऐवजी देशाप्रती समर्पणाची भावना मंचाद्वारे व्यक्त केली जाते. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या संकल्पनेतून हा दिवस असा वेगळ्या प्रकारे साजरा करण्याची उपक्रम पुढे आली.
असाही साजरा केला जातो नगरमध्ये व्हॅलेन्टाईन्स डे
या दिवशी मंचाचे सदस्य व पदाधिकारी नगरमधील सावेडीतील पत्रकार चौकातल्या शहिद भगतसिंग एल अँड टी उद्यानात एकत्र जमले. त्यांनी शहीद भगतसिंगांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. तिरंगा झेंडा हातात घेऊन भारत माता की जयचा घोष केला.
शहीद भगतसिंग व पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
या दिवशी व्हॅलेंटाईनचे स्मरण न करता आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी शाहिद झालेले भगतसिंग तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यात आले. तसेच स्त्री पुरुष संबंधातील प्रेम व्यक्त करण्याऐवजी आपसातील माणुसकी स्नेहभाव जपावा व आपल्या देशाची एकता अखंडीत राहावी यासाठी मंचाच्या वतीने सर्व धर्मियांना एकत्र आणण्यात आले. हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्मिय बांधवांच्या हातात गुलाब पुष्प देहून हम सब एक हे चा नारा देण्यात आला.
Also Watch This Adn Subscribe
आपल्या देशाला जातिव्यवस्थेतुन एकमेकांनाच तिरस्कार करण्याची कीड लागली आहे. यामुळे आपल्या देशातील एकता राहत नाही . जातीपातीमधील द्वेषातून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. हे सर्व थांबवून आपण सर्व जण एकत्रच आहोत आणि आपल्या सर्वांचा मानवता हाच एक धर्म आहे असा संदेश या अनोख्या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी सुनील पंडित, डेव्हिड चांदेकर, मेहमुदा पठाण, सांगळे मॅडम, शारदा होशिंग, प्रकाश भंडारे, अभय गुंदेचा, भैरवनाथ खंडागळे , कैलास दळवी,शेख अर्शद , सुनिल कुलकर्णी बी यु कुलकर्णी हरजीत सिंग वधवा, योगेश गणगले, बाळासाहेब भुजबळ, प्रशांत गायकवाड, विष्णू सामल, जया मुनोत, मकरंद घोडके अमेय मुळे, प्रसाद कुकडे उपस्थित होते.