कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ती कशी पोहोचणार जनतेपर्यंत
कसे आहे पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचे नियोजन
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर ती जनतेपर्यंत पोहोचवता
यावी म्हणून पूर्वतयारी- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
पुणे, दिनांक 4- कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच कोरोना लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच कोरोना लस उपलब्ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे. लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून NEGCAV (National Expert Group on Vaccine Administration for COVID 19) स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. आहे..
कसे आहे पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचे नियोजन
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, या माध्यमातून लसीकरणासाठी प्राधान्य घटक ठरवणे, लसीकरण मागणी, साधनसामुग्री व लस देण्याबाबतची व्यवस्थेबाबत मार्गदर्शक सूचना ठरवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून CVBMS ( COVID 19 Vaccination Beneficiary Management System) ही कोरोना लस प्रणाली तयार करण्यात येत आहे. प्रथम फेरीत आरोग्य संस्था व आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची माहिती एकत्र करण्यात येत आहे. यामध्ये खाजगी व शासकीय संस्था यांचा समावेश आहे. या घटकांना लस उपलब्ध झाल्यानंतर कोविड १९ लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे व यांच्या माध्यमातून पुढील लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील आरोग्य विषयक घटकांची घेतली जाणार मदत
पुणे जिल्ह्यामध्ये अंदाजे 1 लाख 10 हजार आरोग्य व्यवस्थेत काम करणारे विविध घटक आहेत, या अनुषंगाने माहिती मागवणे, एकत्रित करणे. ही माहिती सीव्हीबीएमएस प्रणालीवर अपलोड करणे तसेच प्रशिक्षण, लसीकणाची साधन सामुग्री उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ इत्यादी बाबत आढावा सुरु करण्यात आला असून यासाठी UNDP यांचे सहकार्य घेण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
आरोग्य व्यवस्थेतील कोविड १९ लसीकरणासाठी प्राधान्याने निवड करण्यात आलेले घटक (शासकीय व खाजगी संस्था दोन्हीकरिता)
1)अग्रभागी कार्यरत कर्मचारी ( front line health workers)- आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक तसेच अंगणवाडी सेविका इत्यादी
2) नर्स सुपरव्हायजर : PHN, LHV, CHO, HA, BEO ( H ) इत्यादी
3) वैद्यकीय अधिकारी: MBBS, Post graduate, Teaching and Non teaching, Administrative doctors, AYUSH Doctors, Dentists.
4) Paramedical staff : OT technicians LAB Technicians, pharmacists, physiotherapists, radiographers, ward boys etc
5) Scientists and Research staff
6) Students : medical, dental, AYUSH Nursing and Paramedical students
7) Support Staff dietary staff, CSSD staff, BMW staff, Sanitation workers, Ambulance drivers, Security staff, other support staff
8) Clerical and administrative staff – data entry operators, engineers, clerical staff in hospital
9) Other health staff working in the facility not covered above
मार्चपासून सुरु आहे कोरोनाविरुद्धचा लढा
मार्च २०२० मध्ये पुणे जिल्ह्यात कोविड १९ चा प्रथम रुग्ण आढळल्यापासून आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने अहोरात्र काम करत आहे. त्यात शासकीय व खाजगी दोन्ही क्षेत्रात हे काम सुरु आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत दैनंदिन सर्वेक्षण, संपर्क शोध, किरकोळ आजार ते गंभीर आजारी रुग्णांचे अति दक्षता विभागातील व्यवस्थापन इत्यादी कार्य अव्याहतपणे सुरु आहे. या प्रक्रियेमध्ये आरोग्य यंत्रणेतील अनेकांना कोविड लागण झाली. काहींना आपले प्राण गमवावे लागले. तरीही माघार न घेता आरोग्य यंत्रणेतील आपले कोविड योद्धे कोरोना प्रतिबंधाचे कार्य करीत आहेत व या पुढेही हे कार्य असेच सुरु राहणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या संदेशात व्यक्त केला आहे.
कोविड १९ लस उपलब्ध झाल्यानंतर ती सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान असणार आहे आणि ही लस आरोग्य व्यवस्थेमार्फत जनतेपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे ही लस देताना कोविड १९ चा प्रसार रोखला जाईल हे पाहणे जितके महत्त्वाचे आहे. तेव्हढेच आरोग्य यंत्रणेतील घटकांचे कोविड १९ पासून संरक्षण करणे हेही आवश्यक आहे. यामुळे प्राधान्याने आरोग्य व्यवस्थेतील सर्व घटकांना ही लस देणे आवश्यक ठरते, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.
भविष्यात येणारी कोरोना लस व सद्यस्थिती: कोविड १९ लसी संदर्भात सध्या मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. अनेक लसी फेज ३ ट्रायलमध्ये आहेत. लवकरच लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे. तरीही या प्रक्रियेसाठी व लस तयार झाल्यानंतर ती सर्व जनतेपर्यंत पोहोचताना वेळ लागणार आहे. सध्या पुणे जिल्हा व राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. दैनंदिन अहवाल पाहता रुग्ण संख्या व मृत्यु कमी झाल्याचे दिसून येते. तथापि, युरोप, दिल्ली, केरळ या ठिकाणी परत रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे आणि ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. आवश्यक काळजी न घेतल्यास आपल्याकडेही अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पुढील काळात लस उपलब्ध होईपर्यंत सर्वांनी सतर्क राहून सुरक्षित अंतर (६ फूट), मास्कचा वापर व हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा सातत्याने वापर करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.