दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद जमदारे यास जामीन मंजूर

पोलीस तपासातील त्रुटींचा आरोपीना मिळाला फायदा

पुणे (प्रतिनिधी): येथील सिहंगड रोड वर नवले पुलाच्या परिसरात रस्ता लूट करण्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद शिवाजी जमदारे याला जमीन मंजूर झाला आहे. सिह्गड रोड पोलिसांनी दिनांक २१ डिसेंबर रोजी दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींची टोळी पकडली होती . त्यात विनोद जामदारे (32, रा. जाधवनगर, वडगांव), रोहित विकास शिनगारे (19, रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर), विशाल विठ्ठल रणदिवे (22, रा. बार्शी, जि. सोलापूर), गौरव गंगाधर शिंदे (रा. मु.पो. ताडसौदने, ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि नितीन सुरेश जोगदंड (35, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांचा समावेश होता . त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने त्यांची रवानगी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत केली होती. त्यात पोलिसानी तपास केला आरोपींची कसून चौकशी केली पण त्यांना सबळ पुरावा मिळून आला नाही. आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी नायालयीन कोठडीत झाली . त्यानंतर या 4 आरोपींनी न्यायालयात वैयक्तिक जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचे अर्ज मंजूर झाले .  नंतर विनोद जमदरे याने  ॲड.   आदेश चव्हाण यांच्या मार्फत शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी ॲड.आदेश चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरीत त्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला . अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच बी सिरसाळकर यांनी आरोपीची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आरोपीचे वकील चव्हाण यांना ॲड. सुलेमान शेख यांनी सहाय्य केले.