मंडईमध्ये भरदिवसा गोळीबार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

गुन्हेगाराला हत्यार पुरविणारा आरोपी आला जेल बाहेर

मंडईतील बहरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर.

पुण्यात मंडई परिसरात भर दिवसा झालेल्या गोळीबार मधील आरोपीस जामीन मंजूर झाला आहे. जून महिन्यात ही घटना घडली होती. यातील अटक आरोपी गणेश कोळी याना नायालयाने जामीन मंजूर केला आहे.
आपल्या मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीने  पुणे येथील मंडई परिसरात गोळीबार केला होता. यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. मंडई मध्ये गोळीबार प्रकरणी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसानी आरोपीना तात्काळ अटक देखील केली होती. यात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ज्यांनी अग्निशस्त्र पुरवली अशा गणेश कोळी या आरोपीला देखील पोलिसांनी पकडले होते.
त्यानेच आरोपीना पिस्तूल पुरवल्याच्या  आरोप त्यावर होता . या गुन्ह्यात कोळी हा जून २०२२ पासून जेल मध्ये होता. त्याचा जामीन वर्ग विधीज्ञ विपुल अंदे यांच्या मार्फत ठेवण्यात आला.

अ‍ॅड.अंदे यांनी आपल्या युक्तीवादा मध्ये मे. न्यायालयास पटवून त्यांनी दिले की आरोपी हा मोक्याच्या गुण्यात जून 2022 पासून जेलमध्ये आहे.परंतु हा आरोपी हा सदर गुन्हा घडण्याच्या सहा ते सात महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असून त्याचा या गोळीबाराशी काही एक संबंध नाही.
सदरचे युक्तिवाद ग्राह्य धरून मे.शिरसाळकर साहेब (जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) यांनी आरोपी गणेश कोळी यास जामीन मंजूर केला.
या जामीन अर्जासाठी अँदेयांना अ‍ॅड. भक्ती अंदे यांनी  सहाय्य केले.