राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.
छावणी परिषदेच्या पथकर नाका घेणारया एन.एच.इंजीनियरिंग कंपनीने व ठेकेदाराने बँक गॅरंटी 4 करोड 50 लाख रुपयाचे बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप - मतीन सय्यद.
प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)
छावणी परिषदेच्या व्हींकल इंट्री टॅक्स पथकर नाका 2020-2021 घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून केंद्र सरकारचे आर्थिक नुकसान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देताना शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद उपस्थित होते.
ठेकेदाराने पथकर नाका घेताना बँक गॅरंटी बँक सोळवेन्सी 4 करोड 50 लाख रुपयांची देण्यात आली आहे यामध्ये बँक गॅरंटी हे बनावट असल्याचे सय्यद यांच्या निदर्शनास आले असता जिल्हाधिकारी यांना ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. तसेच छावणी परिषदेच्या पथकर नाका एन.एच.इंजिनीअरिंग कंपनीने घेतला होता. पथकर नाका हा टेंडर घेतल्यावर ठेकेदाराला एक लाख 30 हजार रुपये रोजचे कलेक्शन आहे व होते त्यांना दोन महिने मुदतवाढ दिल्याने छावणी परिषदेचे 1 कोटी रुपयाचे नुकसान झालेले आहे.
त्यामुळे छावणी परिषदेमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आत्तापर्यंत चार महिन्याचे पगार देखील झालेले नाही पथकर नाका मॅनेजर व कर्मचारी कामावर रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत त्यांचे पगार देण्यात आलेले नाही कर्मचाऱ्यांचा पगार तसेच नाक्याचे भ्रष्टाचाराची चौकशी त्वरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.