पहिला खड्डा बुजत नाही तोच झाला दुसरा खड्डा

मनपा चा गलथान कारभार.

ऋषिकेश राऊत

 

गेल्या ७ दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या पावसामुळे नगरच्या  रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय  झाली आहे. त्यात आणखी भर म्हणजे  पालिकेने  पाईप लाईन टाकण्याच्या नावाखाली नगरचे रस्ते जणू जे सी बी च्या साहाय्याने  नांगरण्यात आलेले आहेत. त्यातच बाजारपेठेत ड्रेनेज फुटून खोल खड्डा पडला होता.

 

 

                                        कापडबाजार सारख्या रहदारीच्या ठिकाणी भर चौकात  हा ७ फुट खोल खड्डा  होता . कापड बाजारातील व्यापार्यांनी महानगर पालिकेला व स्थानिक नगरसेवकांना निवेदन देऊन ७ फुटी खड्डा लवकरात लवकर बुजवण्यास सांगितले. प्रशासनाला उशिरा का हौइना जाग येऊन हे काम शनिवारी चालू  केले. काम चालू असतानाच या ७ फुटी खड्डया पासून काही अंतरावरच एक अजून खड्डा झाला आहे. तेलीखुंट पोवार हाऊस  पासून एम जी रोड कडे डावी बाजूने जाताना हे ड्रेनेज  फुटले आहे. आत्ता पर्यंत या ड्रेनेज चे काम २५ ते ३० वेळा फुटलेले आहे. त्यापैकी १० वेळेस या ड्रेनेज चे काम करण्यात आले असेल. परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे हे ड्रेनेज सारखे फुटत आहे.

 

 

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

                          आता हा दुसरा खड्डा बुजवायला महानगर पालिकेला कधी मुहूर्त मिळेल हे कोणास ठाऊक ?  असा सवालही पडतो.