डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने शहीद दिनानिमित्त भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांना अभिवादन
देशासाठी बलिदान देणार्या क्रांतीकारकांचा पुरोगामी विचार समाजासाठी दिशादर्शक -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)-
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सुनिल सकट, बाळासाहेब माळी, शिवाजी भोंडवे, गोविंद देशमुख, देवेंद्र जोगळेकर, मनोज हिरणवाळे, प्रशांत ठाणगे, प्रसाद एडके, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, भगतसिंहांनी धर्म व राष्ट्रप्रेमाची केलेली व्याख्या आजच्या युवकांपुढे पुन्हा नव्याने मांडण्याची गरज आहे. भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांचा क्रांतीकारी पुरोगामी विचार समाजासाठी दिशादर्शक आहे. देशासाठी या शहीदांचे बलिदान न विसरता येणारे असल्याचे त्यांनी सांगितले.