पोलीस मित्र संघटनेच्या वतीने जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान

सृजनाची निर्मिती करणारी स्त्री सक्षमच -शारदा होशिंग

अहमदनगर (प्रतिनिधी)-

 

 

अहमदनगर जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वच्छतादूत शारदा होशिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहल शेडगे, शालन शेडगे, सर्व महिला अधिकारी व कर्मचारी ,कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे उपस्थित होते.

 

 

 

 

शारदा होशिंग म्हणाल्या की, घर संसार सांभाळून नोकरी करणारी व सर्व आघाड्यांवर काम करणारी महिला ही सक्षमच असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी, बहीण, पत्नी, आई या स्वरुपात आपली भूमिका खंबीरपणे बजावत असते. सृजनाची निर्मिती करणारी स्त्री सक्षमच असते. ती संपूर्ण कुटुंबाला प्रकाशमय करुन टाकते. ज्या घरातल्या स्त्रिया आनंदी, समाधानी असतात त्या घरात देवता निवास करतात. कारागृहातील  कार्यरत असणार्‍या तूम्ही महिला देश सेवेचे कार्य करीत असून, सजृनशील समाज घडविण्यासाठी योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सबस्क्राइब करा 

 

 

स्नेहल शेडगे व शालन शेडगे यांनी महिलांना आपले कृर्तव्य व जबाबदार्याय पार पाडून आपले कर्तृत्व सिध्द करावे लागते. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृहात कार्यरत असलेल्या सुजाता शेळके यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी सर्व महिला अधिकारी व कर्मचारी पुरुषांप्रमाणेच कारागृहात कर्तव्य बजावत असतात. या सत्काराने त्यांना काम करण्यास आनखी बळ व प्रेरणा मिळणार असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.