मोकाट श्वान निविदेबाबत छाननी समितीचा पक्षपात

महापालिका : निविदा दाखल केलेल्या संस्थेचा आरोप

नगर शहरातील मोकाट अश्वानांचे निर्भीजीकरण लसीकरण व पालन पोषण कामासाठी दाखल केलेल्या निविदेत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली असतानाही महापालिकेच्या छाननी समितीने पक्षपात करत आमची निविदा नाकारल्याचा आरोप युनिवर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटीने केला आहे. याबाबत सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हनुमंत शेळके यांनी मनपा आयुक्तांसह छाननी समिती सदस्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा हद्दीतील मोकाट अश्वानांचे निर्मिती करण लसीकरण व पालनपोषण कामासाठी आमच्या संस्थेने निविदा दाखल केली होती. मात्र निविदा छाननीमध्ये पक्षपातीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहेत. यामध्ये आमच्या संस्थेकडे सर्व कागदपत्र असतानाही आम्हाला जाणीवपूर्वक डावले आहे, व पात्रता नसूनही इतर संस्थांना पात्र केले आहे. आमच्या संस्थेने मुंबई महापालिकेत 25 हजार शस्त्रक्रिया केलेला दाखला जोडलेला आहे. तसेच संस्थेने अहमदनगर मनपा मध्ये सन 2018-19 सालात पाच हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया पूर्ण केलेले आहे. संस्थेकडे व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र असून दोन वर्षांचे चलनही जोडलेले आहेत. तसेच अनुभवही आहेत त्यामुळे आमच्या संस्थेला पात्र करावे. असे या निवेदनात म्हटले आहे.