दीड हजारांची लाच वसुली सहाय्यक पकडला रंगेहात
राहुरी तहसील कार्यालयातील वसुली सहाय्यकास दीड लाख हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. सुनील भागवत भवर असे वसुली सहाय्यकाचे नाव आहे. तक्रारदार यांची राहुरी तालुक्यातील रामूपर येथे दीड एकर शेत जमीन आहे. त्यापैकी 30 गुंठे क्षेत्रावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागलेले होते. शासनाचे नाव कमी करून तसे पत्र देण्यासाठी महसूल सहाय्यक भवर यांनी दोन लाख हजारांची लाच मागितली होती. दरम्यान तक्रारदार यांनी येथील प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने राहुरी तहसील कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी महसूल सहाय्यक भवर यास लाज स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे पोलीस नाईक चंद्रकांत काळे सचिन सुद्रिक दशरथ लाड आदींच्या पथकाने केली याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.