जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृति नाण्याचे आज मुंबईत होणार विमोचन

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शानदार सोहळा

ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक व जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त शंभर रुपयांच्या स्मृती नाणे विमोचन दोन जुलै रोजी दुपारी चार वाजता मंत्रालया जवळील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार सोहळा संपन्न होणार आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीत आपल्या लेखणीने व कर्तृत्वाने सुवर्णयोग निर्माण करणाऱ्या बाबूजींच्या कार्याचा गौरव करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत. जवाहरलाल दर्डा यांचे जन्म शताब्दी वर्ष लोकमत परिवाराने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गतवर्षी साजरे केले. बाबूजींवरील गौरव ग्रंथाचे प्रकाशनही केले. बाबूजींच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा परमोच्च बिंदू मंगळवारी नाण्याच्या विमोचनाने साधला जाणार आहे. यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मान्यवर उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.