प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांना मातृशोक

 
मुंबई :
 
प्रसिद्ध  गायक-संगीतकार  व ‘ऑस्कर’ विजेता ए.आर.रहमान यांच्या आईचे आज निधन झाले आहे.  खुद्द रहमान यांनीच सोशल मीडियाद्वारे ही दुखःद बातमी दिली आहे. 
सोशल मीडियावर त्यांनी आपल्या आईचा फोटो शेअर केला आहे. ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम गेल्या काही काळापासून आजारी होत्या.  रहमान त्यांच्या आईच्या खूप जवळ होते.  त्यामुळे आई गेल्यानंतर रहमान यांना मातृशोक अनावर झाला होता.