नातीसाठी, आजीची पोलीस अधीक्षकांकडे धाव
अल्पवयीन मुलीस घरातून जबरदस्तीने पळून नेऊन लग्न करणाऱ्या मुलावर व त्याच्या कुटुंबीयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोणी खुर्द ता.राहता जिल्हा अहमदनगर येथील सुशीला सोपान दिवे यांच्या नातीला त्याच परिसरातील मोहन उर्फ सनी प्रसन्न लोंढे हा धमकी देऊन वारंवार दोघांनाही मारहाण करत आहे. मागील तीन महिन्यापूर्वी देखील मोहन उर्फ सनी प्रसन्न लोंढे याने दारूच्या नशेत आजीला व नातीला मारहाण केली होती व मुलीच्या अंगावर चाकूने वार केले होते. परंतु त्यावेळी मुलीची आजी सुशीला सोपान दिवे हे लोणी खुर्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद देखील घेतली नाही. कारण सनी लोंढे याचे अवैध दारूचे धंदे असल्याने त्याचे पूर्वीपासून पोलिसांसोबत संबंध आहे. त्यामुळे सनी लोंढे याने मागील बुधवारी ३ वाजता अल्पवयीन मुलीला तिच्या आजी विरुद्ध घरातून ओढत नेऊन तिच्याशी अल्पवयीन असताना देखील कायदेशीर उल्लंघन करत लग्न केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन मोहन उर्फ सनी प्रसन्न लोंढे याच्यावर व त्याच्या कुटुंबीयांवर किडनॅपिंग करणे व बालविवाह कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व सुशीला सोपान दिवे यांना पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले यावेळी जन आदर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी, दीपक गुगळे, शहानवाज शेख, अशोक बनसोडे, वसीम शेख आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की येत्या पंधरा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.