सव्वातीन लाख रुपयांना मनपा ठेकेदाराला गंडा

नगर : महापालिकेच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी 1100 सिमेंट गोण्यापोटी 3.20 लाख रुपये घेऊन सिमेंट न देता ठेकेदाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सचिन अरुण दशपांडे यांनी शनिवारी संध्याकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपोवन रस्त्यावरील सीएसटी एंटरप्राईजेस दुकानाचा मालक हर्षवर्धन गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशपांडे हे शासकीय ठेकेदार असून ते दत्तराम कैकाडी मजूर सहकारी संस्थेच्या नावाने कामे घेतात. त्यांनी फेब्रुवारीमध्ये महापालिकेकडून नालेगाव येथे काँक्रिटीकरणाचे काम घेतले होते. काम सुरू असताना त्यांना सिमेंट कोणाची गरज असल्याने त्यांनी हर्षवर्धन गावडे यांच्याशी संपर्क केला. गावडे हा 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी देशपांडे यांच्या अभय सेल्स दुकानात आला. व त्याने 2090 पूर्णांक 91 रुपये दराने 1100 गुन्हे देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार देशपांडे यांनी त्याला दुसऱ्या दिवशी तीन लाख वीस हजार रुपये आरटीजीएसद्वारे दिले. गावडे याने पैसे देऊनही देशपांडे यांना गोण्या दिल्या नाही. त्यामुळे त्यांनी जोडीदार कैलास बापूराव शिंदे यांना सोबत घेऊन सीएसपी एंटरप्राईजेस या दुकानात चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी, ‘हर्षवर्धन हा येथे राहत नाही. तो पुणे येथे राहतो. त्याने बऱ्याच लोकांना असं फसवलेले आहे. तुम्ही तुमचे पैसे विसरून जा.’ असे सांगितले. त्यामुळे देशपांडे यांनी पोलिसात फिर्याद दिली. व या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे. दरम्यान महापालिकेच्या ठेकेदाराचे फसवणूक झाल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.