अहमदनगर कॉलेज मध्ये ‘नेक्सजेन २०२५’ प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाला विद्यार्थ्यासह नगरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी

नगर- येथील अहमदनगर विद्यालयामध्ये विद्यालयाच्या बी.बी.ए. आणि बी. कॉम(बिजनेस मॅनेजमेंट) विभागातर्फे भव्य ‘नेक्सजेन २०२५’ मॅनेजमेंट एक्जीबिशन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक भन्साळी टी.व्ही.एस तर सह प्रायोजक राजभोग स्वीट आणि द मिस्टिक आय हे होते. नेक्सजेल २०२५ प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह नगरकरांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
     प्रदर्शनात कपडे,इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, परफ्यूम,बेकरी,खाद्यपदार्थ,ज्वलरी,मोबाईल्स असे ५५ पेक्षा जास्त विविध प्रकारचे दुकाने थाटली होती. विद्यार्थ्यांना जे अभ्यासक्रमात शिकवले जाते त्याच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल, टीम वर्क, डिसीजन मेकिंग,आशा गुणांमधे वाढ होण्यास मदत व्हावी या साठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते असे मत यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी मांडले.
     प्रदर्शनाला विद्यार्थ्यासह नगरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.   यावेळी श्री.अभिनंदन भन्साळी, श्री.जितेंद्र खंडेलवाल आणि साक्षी मुनोत यांचा सत्कार बी.बी.ए विभाग प्रमुख डॉ. तुषीता अय्यर यांनी केला.
      प्रदर्शनाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले त्यांना  प्रा.तृप्ती कोठारी. प्रा.सपना स्वामी प्रा.शीतल कुलकर्णी प्रा.हरित गांधी प्रा.मोनिका खुबचंदानि, प्रा.निकिता गुगळे प्रा.अबोली पुंड, प्रा.हिर खानचंदानी,हृषीकेश गायके यांनी विशेष सहकार्य केले. यावेळे विद्यालयाचे सर्व उप प्राचार्य,विभाग प्रमुख,कमिटी हेड सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन प्रा.शीतल कुलकर्णी यांनी केले.