अहमदनगरऐवजी आता अहिल्यानगर

राज्याच्या महसूल आणि वन विभागाचे राजपत्र जारी

अहमदनगर शहराचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर मंगळवार (९ ऑक्टोबर) . जिल्ह्याचेही नाव अहिल्यानगर त करण्याचे राजपत्र जारी करण्यात आले आहे . अहमदनगर उपविभागाचे • अहिल्यानगर उपविभाग, अहमदनगर तालुक्याचे अहिल्यानगर तालुका व अहमदनगर गावाचे नाव अहिल्यानगर नामांतर करण्याबाबत महसूल, वन विभागाने राजपत्र जारी केले आहे. त्यानुसार आता शहरासह जिल्ह्याचेही नामांतर आता अहिल्यानगर झाले आहे. नामांतराच्या पार्श्वभूमीवर शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कागदपत्रे व फलकांवर ‘अहिल्यानगर’ असे नाव लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ मे २०२३ रोजी चौंडी (ता. जामखेड) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ जयंतीनिमित्त अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ४ ऑक्टोबर रोजी रात्री अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (९ ऑक्टोबर) अहंमदनगर जिल्ह्याचेही नामांतर अहिल्यानगर करण्याबाबत महसूल व वन विभागाने गॅजेट जारी केले आहे.